केंद्रीय पत्रकार संघाचा ४ था वर्धापन दिवस साजरा होणार

इस्लामपूर सांगली मध्ये..
by: अन्वर इनामदार


loading


इस्लामपूर (2024-03-09) - सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटना ही एक राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांसाठी लढणारी आणि त्यांच्या विकासासाठी काम करणारी संघटना असून या संघटनेत आतापर्यंत देशभरात पन्नास हजाराहून अधिक पत्रकारांचा समावेश आहे. या संघटनेला आतापर्यंत तीन वर्ष पूर्ण झाली असून चौथ्या वर्षात ही संघटना पदार्पण करणार आहे त्यासाठी १३ मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १० मार्चला सांगलीतील इस्लामपूर तालुक्यामध्ये सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ना.बच्चू कडू (भाऊ) यांच्या मार्गदर्शनात वाटचाल करणाऱ्या प्रहार शिक्षक संघटना पुरस्कृत "प्रहार क्रांती सन्मान सोहळा" हा दिनांक १० मार्च रोजी इस्लामपूर येथील सद्गुरु आश्रम शाळा सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण, तहसीलदार धनश्री यादव, दै. पुढारीचे उपसंपादक सुनील माने आणि प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष दिग्विजय पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष उमेश शेवाळे आणि सदगुरु आश्रम शाळेचे संस्थापक एकनाथराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच विशेष उपस्थिती आंतरराष्ट्रीय महोदगार संघटनेचे महासचिव अनवर इनामदार, सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे इतरही सन्माननीय पत्रकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवर वाळवा- शिराळा तालुक्यातील आदर्श पत्रकार आणि आदर्श शिक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.