आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन व विमल हॉस्पिटल तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (२६ जानेवरी २०२४) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा व विमल हॉस्पिटल तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज तासगाव येथे आरोग्य शिरबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिराची उद्घाटन आंतरराष्ट्रीय वार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या याप्रसंगी विविध आजारावर मोफत उपचार व औषध रुग्णांना पुरवण्यासाठी विमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय देवकुळे व डॉ झांबरे यांनी सहकार्य केले. सदर आरोग्य शिबिराला तासगाव व परिसरातील 150 लोकांनी लाभ घेतला. अशी माहिती डॉक्टर संजय देवकुळे यांनी दिली.

उद्घघाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राकेश कांबळे, उपाध्यक्ष श्री कृष्णा म्हेत्रे, जिल्हा महासचिव श्री अनवर इनामदार, सांगली जिल्हा सहसचिव दीपक पाटील, तासगाव तालुका अध्यक्ष विकास खबाले,तासगाव सहसचिव विशाल टेके, तासगाव तालुका समन्वयक सतीश चव्हाण, सांगली शहराध्यक्ष गौतम लोटे, पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माने, सचिव धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष अमोल लाड, तसेच ग्राहक पंचायत पुणे विभागीय संघटक आलमशहा मोमीन, व इतर मान्यवर उपस्थित होते.