क्राइम डायरी व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेची संयुक्त बैठक संपन्न

क्राइम डायरी व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेची संयुक्त बैठक पुणे येथील हॉटेल द रिझन्ट येथे संपन्न झाली
by: अन्वर इनामदार


loading


पुणे (२५ सप्टेंबर) - दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी क्राइम डायरी व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेची संयुक्त बैठक पुणे येथील हॉटेल द रिझन्ट येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये शिक्षणाचा मुलभूत अधिकार व शिक्षणाचे होऊ घातलेले खाजगीकरण यावर चर्चा झाली. मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्हावार माहिती घेऊन एकत्रित मसूदा तयार करून राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठविण्याचा सल्ला संघटनेचे अध्यक्ष मा. सुदाम पेंढारे यांनी दिला.

तसेच मिरज जिल्हा सांगली येथील रेल्वे स्थानक जवळ असलेल्या वाघमारे प्लॉट व परिसर येथे राहणाऱ्या तीन ते चार हजार लोकांना ये जा करण्यासाठी रस्ता (फाटक) रेल्वे प्रशासनाकडून अचानक बंद करण्यात आले असून येथील रहिवाशांना जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा फिरून किमान चार ते पाच किलोमीटर अंतर चालावे लागते याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कडून रस्ता मिळण्यासाठी वरील पातळीवर प्रयत्न होणे बाबत चे निवेदन संबंधितांनी संघटनेच्या अध्यक्षांना दिले.

त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही विषयक निर्णय घेण्याचे अध्यक्षांनी आश्वासन दिले, तसेच इतरही सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत क्राइम डायरी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यपद्धती विषयी माहिती मा. सुदाम पेंढारे यांनी दिली.

सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. सुदाम पेंढारे, उपाध्यक्ष मा. श्रीकृष्ण मोहिते, पुणे येथील पत्रकार श्री. संदीप देबाडे, कायदेतज्ञ अॅड. सुभाष माछरे साहेब, मा. शिक्षणंधिकारी रावलकर साहेब, सांगली जिल्हा मा.अध्यक्ष राकेश कांबळे, सांगली उपाध्यक्ष मा. कृष्णा(नाना ) मेहेत्रे, जिल्हा महासचिव मा. अनवर इनामदार, पलूस तालुका अध्यक्ष मा. दत्तात्रय माने साहेब, तासगाव शहराध्यक्ष मा. भानुदास पाटील, मिरज तालुका सचिव मा. रणधीर कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.