सांगली येथे मानवाधिकार दिन उत्साहात साजरा !

मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचा प्रसार होणे गरजेचे. - न्यायमूर्ती, प्रविण नरडेले
by: अन्वर इनामदार


loading


सांगली (१० डिसेंबर २०२३) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारती विद्यापीठ भवन राजवाडा चौक सांगली येथे मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे त्याचा आदर करणं हि सर्वांची जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर या होत्या. मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला, न्यायदान क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा बहुमान देऊन गौरव करण्यात आला, अनुक्रमे श्री ऋषिकेश पाटील (आदर्श विद्यार्थी) मा. डॉ.अधिकराव जाधव, वरिष्ठ सल्लागार रेशीम प्रकल्प क्यूबा सरकार. (समाजभूषण) डॉ.पूजा नरवाडकर, प्राचार्य भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय सांगली (आदर्श प्राचार्य) यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मालनताई मोहिते, प्रा. संजय ठिगळे, डॉ.पूजा नरवाडकर यांनी मानव हक्क दिनाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वगत व प्रास्ताविक प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी केले व सांगली जिल्ह्यामध्ये मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते तसेच मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, महासचिव अनवर उर्फ आप्पालाल इनामदार, उपाध्यक्ष कृष्णा मेहेत्रे (नाना), सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विद्याधर कांबळे, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. संजय देवकुळे, सांगली जिल्हा सचिव दीपक, पाटील, पलूस तालुका अध्यक्ष दत्ता माने,तालुका सचिव धनंजय गायकवाड, तासगांव Circle सहसचिव विशाल टेके , तासगाव शहर ,अध्यक्ष भानुदास पाटील,मिरज तालुका अध्यक्ष भिमराव सायमोते ,सचिव रणधीर कांबळे, सांगली शहर अध्यक्ष सतीश कांबळे, सचिव गौतम लोटे, सांगली शहर उपाध्यक्ष राकेश कांबळे, तासगाव तालुका सहसचिव सुनील लोहार,,कुपवाड शहर अध्यक्ष बबन तळकिरे, वाळवा तालुका अध्यक्ष अमोल मुळीक, तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे विभागीय सहसंघटक आलमशाह मोमीन, धनंजय मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा म्हेत्रे (नाना) यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सुत्रसंचलन प्रा. सुर्यकांत बुरुंग यांनी केले.