ग्राहक दिना निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र चा ग्राहक सप्ताह निमित्त कार्यक्रम

येत्या २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्राहक दिना निमित्त सध्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र चा ग्राहक सप्ताह निमित्त कार्यक्रम
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (21 December ) - येत्या २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्राहक दिना निमित्त सध्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र चा ग्राहक सप्ताह सुरू आहे. त्या निमित्ताने ते आज तासगाव येथीलएकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी येथे बोलत होते. या कार्यक्रमात कॉलेज चे विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक सहभागी झाले होते. या प्रसंगी ग्राहक पंचायत चे मोमीन म्हणाले एका वर एक फुकट, अथवा भरमसाठ डिस्काउंट च्या विक्री योजना च्या जाळ्यात ग्राहकांनी फसू नये. बारीक सारीक व्यवहार करताना सुद्धा आपल्या ज्ञानाचा व शिक्षणाचा वापर व्यवहारात केला पाहिजे. प्रत्तेक व्यवहारात ग्राहक संरक्षण कायद्याने मिळालेल्या अधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे.

कार्यक्रमात एकूण१२५ विद्यार्थी प्राचार्य ग्राहक सहभागी झाले होते. या वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका तासगाव चे सहसंघटक प्रदीप जाधव, सचिव विजय मोरे तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा महासचिव मा. अनवर इनामदार हे देखील उपस्थित होते.