शासकीय अर्जाकडे माणूस म्हणून बघा

तासगाव तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (२९ डिसेंबर २३) - तासगाव तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

शासनाचे वतीने चालू वर्षी ग्राहक दिन प्रबोधनासाठी सायबर क्राईम ही थीम दिली गेली आहे. त्याप्रमाणे सायबर विभागाने हे काम चोख बजावले आहे.

सांगली पोलीस क्राईम विभागाचे उप निरीक्षक श्री.रोहित पवार यांनी उपस्थितांना सायबर क्राईम बाबत विशेष माहिती दिली. या ठिकाणी ग्राहक पंचायतचे आलमशहा मोमीन व एम. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार अमित रंजन होते. या कार्यक्रमात म्हणाले की. ग्राहकांनी व्यवहार करताना आपल्या शिक्षणाचा वापर व्यवहारात केला पाहिजे. असे केले तर ग्राहक आपली फसवणूक टाळू शकतो. यावेळी .तहसीलदार श्री अमित रंजन आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की. कर्मचाऱ्यांनी समोर आलेला कागद हा कागद म्हणून न बघता त्या कागदा मागचा माणूस बघितला व वरिष्ठांच्या आदेशानंतर काम लगेच होते ते आपली जबाबदारी म्हणून केले तर कामाचा निपटारा होईल.

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तलाठी पतंगराव माने, तसेच तालुक्यातील सर्व तलाठी, राशन दुकानदार, गॅस वितरक व ग्राहक पंचायतीचे तासगाव तालुका संघटक श्री धनंजय मोहित संघटक प्रदीप जाधव, अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे सांगली जिल्हा अध्यक्ष राकेश कांबळे आणि महासचिव अनवर इनामदार, तसेच तासगांव पोलीस अधिकारी नितीन केराम साहेब, पुरवठा निरीक्षक माने मॅडम व इतर ग्राहक उपस्थित होते.