अंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेच्यावतीने मिरज येथील वाघमारे प्लॉट .

रहिवासी रेल्वे गेटचा प्रश्न मार्गी लागणार
by: अन्वर इनामदार


loading


मिरज (11 October) - मिरज : येथील वाघमारे प्लॉट वसाहती मधील रहिवासी यांचे साठी असलेले रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने कोणतेही कारण न देता कायम स्वरुपी बंद करून येथील स्थानिक रहिवाशांची मोठी अडचण केली आहे. अशा अचानक व काहीही न कळवता घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शाळेचे विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या बाबत स्थानिक नागरिक व रहिवासी यांनी लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार यांचेकडे पाठपुरावा केला आहे तसेच जिल्हा अधिकारी, प्रातःधिकारी, तहसीलदार यांना भेटून निवेदन दिले आहे मात्र अघाप कसलीही हालचाल केली नाही.

दरम्यान काल संध्याकाळी अंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी सदर प्रश्ननाबाबत जागेवर जाऊन पाहणी केली व हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असून तो सोडविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू संघटनेच्या माध्यमातून वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष कृष्णा नाना मेहत्रे, महासचिव मा. श्री. अनवर इनामदार, सांगली शहर अध्यक्ष सतीश कांबळे, मिरज तालुका सचिव रणधीर कांबळे, मिरज शहराध्यक्ष मा.मारुती बोरनावल, कुपवाड शहराध्यक्ष मा.बबन तलकेरी तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.