विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम संपन्न..
by: अन्वर इनामदार


loading


वायफळे (तासगाव) (५ डिसेंबर २०२३) - 10 डिसेंबर या मानव अधिकार दिवस व 24 डिसेंबर या ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र व अंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना याचेवतीने श्री.सिद्धनाथ हायस्कूल आरवडे व बाळासाहेब देसाई हायस्कूल वायफळे येथे विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी धनंजय मोहिते व आलमशहा मोमीन यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. तर प्रबोधनासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभागीय सह संघटक आलमशहा मोमीन, तासगाव तालुका संघटक धनंजय मोहिते, सहसंघटक प्रदीप जाधव सचिव विजय मोरे उपस्थित होते. तर अंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटने चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे उर्फ नाना, जिल्हा महासचिव अनवर इनामदार, तालुका उपाध्यक्ष विशाल टेके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.