शिक्षणाचा उपयोग व्यवहारात केला पाहिजे - मा. आलमशाह मोमीन.

तासगाव तालुक्यातील येळावे येथील श्री बाबासाहेब पाटील विद्या मंदिर या विद्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम संपन्न
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (१४ डिसेंबर २३) - तासगाव तालुक्यातील येळावे येथील श्री बाबासाहेब पाटील विद्या मंदिर या विद्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र व अंतर राष्ट्रीय मानव अधिकार संघटना यांचे संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय सहसंघटक श्री आलमशा मोमीन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण फक्त नोकरी पुरते मर्यादित न राहता त्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारात करता आला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने संबंधित कायद्याविषयी जाणून पाहिजे

या कार्यक्रमात 300 विद्यार्थी व शिक्षक तसेंच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघनेचे सांगली जिल्हा महासचिव श्री अन्वर इनामदार हीं सहभागी झाले होते. चालू वर्षी ग्राहक पंचायतीने विद्यार्थ्यांसाठी मी शहाणा होणार हे अभियान छेडले आहे. प्रत्येकाने एकावर एक फुकट, किंवा भरमसाठ व्याज देणाऱ्या ठेव योजना असल्या भुल-थापांना बळी पडू नये.

आभार प्रदर्शन मा. कांबळे सर यांनी केले