मिरज येथे जागतिक महिला दिन साजरा
मिरज पंचायत समिती, आधार जेष्ठ नागरिक संस्था सुभाषनगर, भिमांगन महिला संस्था सांगली यांच्या संयुक्त विध्यमाने जेष्ठ सामाजिक विचारवंत मा.शाहीन शेख सर यांच्या संकल्पनेतूनby: वसंत खांडेकर, मिरज

मिरज (१६ मार्च २०२५) - मिरज पंचायत समिती येथे मिरज पंचायत समिती मिरज,आधार जेष्ठ नागरिक संस्था सुभाषनगर, भिमांगन महिला संस्था सांगली यांच्या संयुक्त विध्यमाने जेष्ठ सामाजिक विचारवंत मा.शाहीन शेख सर यांच्या संकल्पनेतून
जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने महीलांचा आदर, सन्मान राखणारे समतावादी, मानवतावादी, प्रगतशील विचारांचे पुरुषबंधू यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यामध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे मिरज तालुका जाँईंट सेक्रेटरी मा. वसंत खांडेकर यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत बोडरे(गटविकास अधिकारी पं.स.मिरज),मा.ज्ञानदेव मडके(सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.मिरज)
उद्घाटक.मा.शिवश्री ए डी पाटील,
स्वागताध्यक्ष. मा.अंजूमन खान(आधार जेष्ठ नागरिक संस्था),
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पत्रकार गीतांजली पाटील मिरज,मा. हजारे साहेब प्रदूषण नियंत्रण मंडळ, श्रीमती उत्तरादेवी चारीटेबल अँण्ड रिचर्स फाँडेशन पूणे, जयराम कोळी, भारत जाधव,जालिंदर महाडिक, युसूफ अली,सिकंदर शेख, हजरत अली, पत्रकार विनोद पाटील, गुलाब मालगांवे, विजय पाटील, राकेश ढोबळे, पत्रकार दिपक ढबळे, सुनिल माळी कक्ष अधिकारी पं.स. मिरज, मनिषा साळूंखे प्रकल्प अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक मा. सुरेखा शाईन शेख केंद्र प्रमुख आस्था बेघर महीला निवारा केंद्र मिरज, पत्रकार प्रमोद माळी, मा.शाहीन शेख सर,रमजान खलिफा,राजेश साळूंखे, त्रिशल पाटील, अफजल मोमीन, वसंत भोसले, महमंद खाटीक, सुहासीनी शिंदे,सारीका कुलकर्णी, पत्रकार योगेश पांडव, विजयालक्ष्मी कदम, भारत चौगुले, विकास शेळके, रामचंद्र सूर्यवंशी, डाँ.वहीदा फकीर, मनोज कांबळे यांनी ह्या कार्यकरमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सुनील माळी कक्ष अधिकारी पंचायत समिती मिरज यांनी केले व शेवटी आभार मानले.