असोसिएशन ऑफ फिजिसीयन्स नाशिक या संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न
याप्रसंगी डॉ. समीर चंद्रात्रे यांनी अध्यक्षपदाची डॉ. प्रीतम अहिरराव यांनी सचिव पदाची तर डॉ. राहुल पाटील यांनी खजीनदार पदाची सूत्रे हाती घेतली.by: सुदाम पेंढारे
नाशिक (६ एप्रिल) - असोसिएशन ऑफ फिजिसीयन्स नाशिक या संघटनेचा पदग्रहण सोहळा दि. ५ एप्रिल रोजी नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ. समीर चंद्रात्रे यांनी अध्यक्षपदाची डॉ. प्रीतम अहिरराव यांनी सचिव पदाची तर डॉ. राहुल पाटील यांनी खजीनदार पदाची सूत्रे हाती घेतली.
सदर कार्यक्रमास मुंबई येथील सुप्रसिद्ध डॉ. विजय पनिकर व डॉ. विजय नेगलूर हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉ. नारायण देवगांवकर यांनी भूषविले. सदर कार्यक्रमात डॉ. विजय पनिकर व डॉ. विजय नेगलूर यांनी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीस व उपस्थित डॉक्टरांसाठी प्रोत्साहानपद मार्गदर्शन केले.
याप्रसंगी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पुढील कालावधीत असोसिएशन डॉक्टरांसाठी ज्ञान संवर्धनात्मक व सामान्य जनतेसाठी आरोग्य संवर्धन मार्गदर्शनप्रद विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले. उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्या या नियोजनाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
तसेच संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. समीर पेखळे यांनी, संघटनेच्या सर्व कार्यकारिणी व फिजिसीयन्स यांनी एकत्र येऊन संघटनेसाठी आणि समाजासाठी कार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्ण तांबडे व डॉ. राजश्री धोंगडे यांनी केले.
शेवटी असोसिएशनचे सचिव डॉ. प्रीतम अहिरराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
असोसिएशनची नवीन कार्यकारिणी –
अध्यक्ष - डॉ. समीर चंद्रात्रे
उपाध्यक्ष - डॉ. समीर पेखळे
सचिव - डॉ. प्रीतम अहिरराव
सह-सचिव - डॉ. पार्थ देवगांवकर
खजीनदार - डॉ. राहुल पाटील
सह-खजीनदार - डॉ. अतुल अग्रवाल