राष्ट्रीय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणाने मा. अनवर इनामदार,

कृष्णा म्हेत्रे(नाना), आणि राकेश कांबळे यांना कोल्हापूर येथे पुरस्काराने सन्मानित
by: अन्वर इनामदार


loading


कोल्हापूर (2025-04-13) - सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार - २०२५ चे मानकरी सांगली जिल्ह्यातील ता. तासगाव येथील मा. अनवर इनामदार, कृष्णा म्हेत्रे (नाना) राकेश कांबळे यांना कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती सभागृहामध्ये फेटा बांधून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन आदराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतेज उर्फ बंटी पाटील हजर होते.या कार्यक्रमांमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज कवी मंच हा कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आलेल्या कवींनी प्रत्येकाने आपापल्या कविता वाचून दाखवल्या. कोर्टाच्या पायरीवरून कादंबरीचे लेखक अड.कृष्णाजी विठोबा पाटील. तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी ही कविता सादर केली. राजकारणाचा खेळ झाला, सत्तेचं प्याद नाचलं... सर्वसामान्यांचे स्वप्न, मात्र स्वप्नातच हरपल.अशी आताची खरी परिस्थिती त्यांनी कवितेतुन रेखाटली.

यावेळी अनिल म्हमाणे, रमेश अंतिमा कोल्हापूरकर, हर्षवर्धन विवेकी सुरेश केसरकर, शब्बीर सुतार,दिलावर मुल्ला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा प्रेस सेक्रेटरी गौस भाई नदाफ,केंद्रीय पत्रकार संघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार रवींद्र लोंढे आणि उपाध्यक्ष पत्रकार महंमद आत्तार, यांच्यासह जागृत नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी, आणि काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.